Skip to main content

Posts

प्राचार्या श्रीमती आर.एल.निर्मळे मॅडम, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व छात्राध्यापक व छात्राध्यापिका यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप

प्रेस मीडिया लाईव्ह :  श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप , संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन ,(बी.एड) पेठ वडगाव .संस्थेचे संस्थापक श्री स्वर्गीय अशोकराव माने साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त सोमवार दिनांक 12.06 2023 रोजी "अवधूत विशेष मुलांची निवासी शाळा "अंबप येथे विद्यार्थ्याना कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड  महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती आर.एल.निर्मळे  मॅडम, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व छात्राध्यापक व छात्राध्यापिका यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.  यावेळी अवधूत विशेष मुलांच्या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका शिंदे मॅडम यांनी मतिमंद मुलांबद्दल माहिती दिली. तसेच त्यांचे संगोपन, स्वच्छ्ता, आहार, त्यांची ट्रिटमेंट औषधे, त्याची राहण्याची सोय, मुलांच्या व पालकांच्या समस्या, 18 वर्षाखालील विद्यार्थी व 18 वर्षांवरील विद्यार्थी तसेच शिक्षकांची जबाबदारी व शाळेची सविस्तर माहिती दिली. महाविद्यालयाच्या प्राचार्या  सौ आर.एल.निर्मळे- चौगुले यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन त्या ठिकाणची माहिती घेतली.तसेच प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती घेवून त्यांना मार्गदर...

प्रवाशांची गैरसोय झाल्याने काॅंग्रेसने अधिका-यांना धरले धारेवर

  पुणे मेट्रो लाईव्ह : इचलकरंजी : प्रतिनिधी :  शासन आपल्या दारी अभियानासाठी आज मुख्यमंत्र्याचा कोल्हापूर दौरा आहे. या कार्यक्रमासाठी इचलकरंजी बसस्थानकातून बहुतांश एसटी बसेस गेल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बसस्थानकात धाव घेऊन अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी अधिकार्‍यांनी शासन आदेशानुसार बसेस नियोजित कार्यक्रमासाठी गेल्या असल्या तरी प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतल्याचे सांगितले. शासन अपल्या दारी या अभियानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मंगळवारी कोल्हापूर दौर्‍यावर आहेत. त्यामुळे शासन आदेशानुसार इचलकरंजी बसस्थानकातील बहुतांश एसटी बसेस या कार्यक्रमाला नागरीकांना ने- आण करण्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज सकाळी 8 वाजल्यापासून बसस्थानकात प्रवाशांची गर्दी दिसत होती. अनेकांनी बसेसबाबत विचारणा केली असता बसेस नसल्याचे सांगण्यात अले. त्यामुळे लांब पल्यावरून आलेले प्रवाशी तसेच इचलकरंजी बसस्थानकातून पुढील प्रवास करण्यासाठी आलेल्या प्रवाशांतून संताप व्यक्त होता. याबाबत माहिती मिळताच कॉग्रेसचे पदाधिकारी, कार...

डीकेटीई मध्ये मी राजवाडा बोलतोय उपक्रमास भरघोस प्रतिसाद

पुणे मेट्रो लाईव्ह : इचलकरंजी : प्रतिनिधी  इचलकरंजी येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये मी राजवाडा बोलतोय - ओपन हाउस सेशन ऍट कॅम्पस हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने संपन्न झाला. सदर कार्यक्रमास इंजिनिअरींग ला ऍडमिशन धेवू इच्छुक विद्यार्थी व पालकांना आमंत्रित करण्यात आले होते. त्याला ८०० हून अधिक विद्यार्थी व पालकांनी प्रतिसाद दिला. पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी कार्यक्रमाची सुरवात रोपाला पाणी घालून करण्यात आली. त्यानंतर संस्थेच्या प्रभारी संचालिका प्रा. डॉ. सौ. एल. एस. आडमुठे यांनी स्वागतपर मार्गदर्शन करुन कार्यक्रमाची पार्श्‍वभूमी सांगितली. राजवाडयात या, पहा व नंतर आपले मत ठरवा असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. त्यानंतर प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ ए.के. घाटगे यांनी इंजिनिअरींग प्रवेश प्रक्रियेविषयी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सार हे प्रा. डॉ .सौ. अश्‍विनी रायबागी यांनी मी राजवाडा बोलतोय या मनोगतात सर्वांसमोर मांडले. कृष्णा दायमा, सुमोद दानोळे, अमेरिकेहून आलेल्या सलोनी पुरंदरे, शिवतेज थोरात तसेच २५ लाखाचे पॅकेज मिळाले...

हाजी इसहाक पटेल साहब का दिल का दौरा पडने से इंतेकाल हो गया.

         इन्नालीलाही व इन्ना इलयही राजीवून पुणे मेट्रो लाईव्ह: पुणे : बडे दुःख के साथ आपको ये मालूमात दी जाती है के लोनावला शहर के मशहूर व मारूफ सुन्नी मुस्लिम जमात के ट्रस्टी हाजी इसहाक पटेल साहब का दिल का दौरा पडने से इंतेकाल हो गया है. हाजी इसहाक पटेल लोनावला शहर में पिछले कई सालो से इमानो ऐतबार बिना मफादके समाज की खिदमत अंजाम दे रहे थे. हर समाज के प्रति उनके दिल में प्यार वो मोहब्बत थी. किसी भी धर्म की कोई भी समस्या हो उसको वो आसानी से हल करते थे इसीलिए उनका हर धर्म के लोग सन्मान करते थे. covid-19 महामारी का दौर शुरू हुआ. हाजी इसहाक पटेल और उनके साथियों ने सुन्नी मुस्लिम जमात की जानीब से कोरोना से मरने वाले सभी धर्म के लोगो का अंत्यसंस्कार करने का काम सुरू किया. बिलातफ्रिक मजब व मिल्लत जात-पात भाषा के आगे जाकर खिदमत अंजाम दी. लोनावला शहर मे कोविड पॉझिटिव्ह पेशंट के लिए हॉस्पिटल की कमतरता होने के कारण पुणे शहर मे विविध हॉस्पिटल से संपर्क करके बीमार लोगो को हॉस्पिटल में बेड उपलब्ध करा के देना. ऑक्सिजन मशीन पेशंट को उपलब्ध करा कर देना. स्थलांतरित लोगो को खाना. ...

महापालिकेने रस्ते डांबरीकरणाचे कार्यादेश पावसाळ्यानंतर द्यावेत - शशांक बावचकर

पुणे मेट्रो लाईव्ह  इचलकरंजी : प्रतिनिधी :  इचलकरंजी महापालिकेने शहरातील रस्ते डांबरीकरण व इतर कामांबाबत निविदा काढली असून पावसाळयाच्या काळात सदर कामे सुमार दर्जाची होण्याची शक्यता आहे. यातून महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार असून सदर कामांचे कार्यादेश पावसाळ्यानंतर देण्यात यावेत ,अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव व माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की , इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत विविध ८४ कामांची निविदा दि. ११ मे रोजी प्रसिध्द केली आहे. सदर भरलेली निविदा सादर करण्याची अंतिम मुदत दि. ५ जून अखेर होती. तसेच दि. ६ जून रोजी सदरच्या निविदा उघडण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तथापी निविदा प्राप्त झाल्यानंतर सर्व भरलेल्या निविदांच्या कागदपत्रांची छाननी करण्यास व सदर कामाचे कार्यादेश देण्यास विलंब होणार असल्याचे दिसते. सदर कालावधीत पावसाळा सुरु होत असून  सद...

पर्यावरण समस्या सोडवण्याच्या उद्देशाने ठोस कार्य करण्याचा बैठकीत निर्धार

पुणे मेट्रो लाईव्ह :  इचलकरंजी : प्रतिनिधी  इचलकरंजी शहराची जीवनदायिनी पंचगंगा अमृतवाहिनी करण्यासाठी व  जनआयोग नियुक्त करण्यासाठी पर्यावरण दिनानिमित्त समाजवादी प्रबोधिनी येथे प्रांताधिकरी मोसमी चौगुले-बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. पंधरा दिवसांपूर्वी जलपुरुष डॉ राजेंद्रसिंह राणा यांनी नदी, पर्यावरण समस्या सोडवणुकीसाठी जनआयोग नेमण्याची सूचना इचलकरंजीत पर्यावरण कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये केली होती.  त्या अनुषंगाने समाजवादी प्रबोधिनी येथे कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेण्यात आली.पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी जनआयोग गठीत करण्यासाठी झालेल्या बैठकीत प्रदूषित घटकांचा शोध घेणे,कारणे शोधून उपाययोजना करणे,राज्य व केंद्र सरकारकडे नदी स्वास्थ टिकविण्यासाठी प्रयत्न करून पर्यावरण समस्या सोडवण्याच्या उद्देशाने ठोस कार्य करणे आणि हा विषय लोक चळवळीचा बनवणे आदी निर्णय घेण्यात आले.प्रारंभी प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.त्यातून जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीच्या आयोजना मागील भूमिका मांडली.मंचावर अरविंद धरणगुत्तीकर,संदीप चोडणकर,अभिजीत पटवा,र...

प्रा सौ प्रमोदिनी माने यांना पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आल

प्रा सौ प्रमोदिनी माने  यांना  पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले  पुणे मेट्रो लाईव्ह : सौ.प्रमोदिनी माने  कोडोली येथे  दिनांक ३१मे रोजी अहिल्या देवी होळकर जयंती निमित्त महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रतेक ग्राम पंचायत मधील दोन कर्तबगार महिलांचा सत्कार आयोजित केला होता .  कोडोली ग्रामपंचातमध्ये प्रा सौ प्रमोदिनी माने मॅडम यांनी तनिष्का ग्राहक पंचायत प्रविणा फोडेंशन या माध्यमातून समाजात महिलांसाठी अहोरात कोणताही मोबदला न घेता स्वखर्चाने सामाजिक कार्याची दखल घेतली व शासनाने जाहीर केलेला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर पुरस्कार त्यांना मिळाला .  याप्रसंगी ग्रामपंयात सर्व सदस्य सरपंच सौ भारती पाटील ग्रामविकास अधिकारी उपसंरपंच मा श्री प्रविण जाधव . अंगणवाडी सेविका मोठ्या प्रमाणात उपस्थीत होत्या या स्वीच्याउपस्थीत प्रा सौ प्रमोदिनि माने मॅडम व सौ शिर्के मॅडम यांना पुरस्कार देण्यात आला प्रमुख पाहुण्या म्हणून सौ संध्या पाटील यांचे मार्गदर्शन लाभले माने मॅडम यांनी आपल्या सामाजिक कार्य...

राष्ट्रवादी, स्वाभिमानीच्या मागे का जायचं ?

  कोल्हापूर, हातकणंगले काँग्रेस कडेच ठेवा  -  प्रदेश सचिव शशांक बावचकर यांची भूमिका पुणे मेट्रो लाईव्ह  इचलकरंजी : प्रतिनिधी :  राष्ट्रवादीने विधानसभेला आघाडी धर्म पाळला नाही तर स्वाभिमानीने आवाडेंचा प्रचार केला. त्यामुळे त्यांच्या मागे जाण्याची आमची अजिबात मानसिकता नाही. त्यांच्या सोयीसाठी आमचा बळी का देता?  अशी परखड भूमिका काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी मुंबईतील बैठकीत मांडली. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसला पोषक वातावरण आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोल्हापूर, हातकणंगले दोन्ही मतदारसंघ काँग्रेसकडे ठेवावेत, अशी जोरदार मागणी त्यांनी लावून धरली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक झाली. कोल्हापूर जिल्ह्यातून आमदार सतेज पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित होते. दरम्यान ,आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काँग्रेसची दमदार कामगिरी सुरू आहे. भाजपचा एकही आमदार निवडून आला नाही. गोकुळ, जिल्हा बँक, बाजार समिती ही महत्त्वाची सत्ता केंद्र काँग्रे...

प्रेस मीडिया लाईव्हचा तिसरा वर्धापन दीन सोहळा श्री राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे संपन्न होणार

पुणे मेट्रो लाईव्ह :  पुणे : येथील आघाडीचे न्यूज पोर्टल प्रेस मीडिया लाईव्हचा तिसरा वर्धापन दीन सोहळा दिनांक 29.05.2023 रोजी सकाळी 11.00 वाजता कोल्हापूर येथे श्री राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे संपन्न होणार  आहे.  या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.  या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  मा.आमदार श्रीमती जयश्री जाधव कोल्हापूर , कार्येक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रसाद कुलकर्णी, इचलकरंजी हे आहेत , तर  कार्येक्रम प्रमुख उपस्थिती म्हणून दैनिक लोकसत्ताचे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी मा.श्री. दयानंद लिपारे  , ज्येष्ठ कवी श्री  पाटलोबा  पाटील , दैनिक ग्रामदेवता चे संपादक श्री.सखाराम जाधव हे आहेत. या कार्यक्रमाचे व्यवस्थापक श्री मुरलीधर कांबळे ( पत्रकार ) हे आहेत. 

पुणे : येवलेवाडी येथे 63 वा महाराष्ट्र दिन वर्धापन सोहळा संपन्न

पुणे : येवलेवाडी येथे 63 वा महाराष्ट्र दिन वर्धापन सोहळा संपन्न पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे :  येवलेवाडी येथे आज दिनांक एक मे 2023 रोजी नवजीवन अंध अपंग कल्याण मंडळ संचालित प्रशिक्षण केंद्र येवलेवाडी येथे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रपती पदक विजेते माननीय श्री प्रकाश पाटील, ज्येष्ठ समाजसेवक माननीय श्री मुक्तार भाई सय्यद, सोल्जर आय यु फाउंडेशन माननीय श्री. तुषार बाळासाहेब कदम हे सन्माननीय पाहुणे उपस्थित होते.