Skip to main content

Posts

पिंपरी,काळेवाडी परीसरातील पवना नदीपात्रात पूररेषेत भराव टाकणाऱ्या व मैलामिश्रित सांडपाणी नदीत सोडणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा ; अपना वतन संघटना

पुणे मेट्रो लाईव्ह  अन्वरअली शेख :  पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथील पवना नदीपात्रात पूररेषेत बेकायदेशीर भराव टाकणाऱ्या व मैलामिश्रित सांडपाणी नदीत सोडून नदी प्रदूषित करणाऱ्या ठेकेदारावर  कारवाई करण्याची मागणी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिध्दीकभाई शेख यांनी आज दि. २७/७/२०२२ रोजी पिंपरी चिंचवड महापालीकेचे आयुक्त राजेश पाटील , उप प्रादेशीक अधीकारी ,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे केली आहे.          त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटंले आहे की, काळेवाडी , बीआरटी रोड च्या लागत परिसरामध्ये नदीच्या पात्रात भराव टाकून अनधिकृत बांधकामे केलेली आहेत. त्यामध्ये वोर्कशॉप , फॅब्रिकेशन , हॉटेल्स , मंगल कार्यालये , गोडाउन्स अशा आस्थापनांचा समावेश आहे . शहरात काही जणांनी पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचा ध्यास घेतलेला आहे . प्रदूषणच्या नियमांची पायमल्ली करीत अनेकांनी नियम धाब्यावर बसवलेले आहेत. काळेवाडी स्मशानभूमी च्या माघे एका ठेकेदारामार्फत खिल्लारे इन्फ्रस्टकचर लिमीटेड या कंपनीकडून नदीपात्रात काम चालू आहे.परंतु त्यांच्याकडून प्रदूषण व पर्यावरण विषयक नियमां...

मा. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात अर्पण करण्याच्या चांदीच्या पादुकांची मा. उध्दव साहेबांनी आणि रश्मीवहिनींनी पूजा करून केले वंदन : ना. डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे मेट्रो लाईव्ह : मुंबई :  मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वाढदिवसनिमित्त शिवसेना उपनेत्या ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी तुळजापूर येथे श्री. तुळजाभवानी मंदिरात अर्पण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चांदीच्या पादुकांचे आज मा. श्री. उद्धव साहेबांनी आणि रश्मी वहिनींनी पूजा करून वंदन केले. लवकरच या पादुका भवानी मातेला अर्पण करण्याचा संकल्प डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केला आहे.  काल दिनांक २६ जुलै २०२२ रोजी पुण्यात उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहर शिवसेनेच्यावतीने केलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात केलेल्या महाआरतीचा प्रसाद मंदिराचे विश्वस्त श्री. महेश सूर्यवंशी यांनी मा. उद्धव साहेबांसाठी दिला होता. तो आज मा. साहेबांनी आणि रश्मी वहिनींनी मनोभावे ग्रहण केला. या आरतीच्या निमित्ताने पुण्यात खास तयार केलेला सव्वा किलोचा विशेष मोदकही यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे कुटुंबियांना दिला.  मा. श्री. उद्धव साहेबांना उदंड आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे. शिवसेनेची वाटचाल अधिक दिमा...

पुणे शहर में राशन दुकानदार के 6 लाख के जुर्माने को 5 हजार तक के कम करने का विश्वजीत कदम का अजीबोगरीब आदेश

 अध्यन से कई बातों के छुपाने के संकेत मिले। अगर ऐसे आदेश हो रहे हैं तो क्या दुकानदारों को उन के गलती पर जुर्माना  कम होता रहे..? पुणे मेट्रो लाईव्ह : अन्वरअली शेख : पुणे शहर में राशन दुकानदारों से अनाज की चोरी कोई नई बात नहीं है..?  आज कल हम कई जगहों पर खुली आँखों से देख रहे हैं, जबकि कई अखबारों में इस बारे में खबरें छपती रहती हैं, उसी तरह भवानी पेठ में एक सस्ते अनाज दुकानदार पर अनाज (ग्राहकों को अनाज कम करने) का आरोप लगाया गया था। आपूर्ति अधिकारियों  की ओर से लाखों रुपये का जुर्माना लगाया।  लेकिन कहा जाता है कि राज्य के पूर्व मंत्री ने उस कार्रवाई पर सारा पानी फेर दिया है.  दरअसल डॉ बाबासाहेब अम्बेडकर विकास सहकारी उपभोक्ता संस्था लाइसेंस संख्या बी"35 और बी" 77 दुकान भवानी पेठ काशेवाड़ी में एक व्यक्ति द्वारा चलाई जाती है और उन सस्ते अनाज की दुकानों का निरीक्षण आपूर्ति निरीक्षक द्वारा 28 जनवरी 2021 को किया गया था। इसमें 22 त्रुटियां पाई गईं, वजन माप प्रमाणित नहीं किया गया और दोनों दुकानों के लाइसेंस संख्या बी'35 और बी' 77 इस्मा अनिल डांगी के स्वामित्व वाली द...

वन्यजीव जनजागृती कार्यशाळेचे आयोजन

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे दि.२७: मानव- वन्यजीव संघर्ष सोडवण्यासाठी तसेच शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांविषयी जनजागृती करण्यासाठी वन विभाग व रेस्क्यू चॉरिटेबल ट्रस्ट बावधन यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ‘वन्यजीव जनजागृती कार्यशाळा’  उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी दिली आहे.  जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रात १५ जुलैपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. इंदापूर, बारामती, पौड, वडगाव मावळ, शिरोता, पुणे, भांबुर्डा विभागात असणारे महाविद्यालय, शाळा, स्थानिक समुदाय, ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांमध्ये जनजागृतीच्यादृष्टीने दौंड वनपरिक्षेत्रा पासून या उपक्रमाची सुरूवात झाली आहे.  दौंड वनपरिक्षेत्रांतर्गत आठवड्याच्या कालावधीत १० शाळा व महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था व स्थानिक नागरिक असे एकूण १ हजार ८४० नागरिकांनी कार्यशाळेत सहभाग नोंदविला. कार्यशाळेत रेस्क्यू टिमच्यावतीने विविध प्रजातीच्या प्राण्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. नाग, घोणस, फुरसे, मण्यार यासारख्या विषारी सापांची माहिती चित्रफितीद्वारे देण्यात आली. बिबट...

कोल्हापूर मध्ये उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून निष्ठा यात्रा काढण्यात आली.

शिवसैनिकांसह महिलांचाही उस्फूर्तपणे निष्ठा यात्रेत सहभाग दिसून आला. प्रेस मीडिया लाईव्ह :  मुरलीधर कांबळे : कोल्हापूर :   शिवसेने मध्ये झालेल्या अभूतपूर्व बंडाळी नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज 62 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांचा वाढदिवस शिवसैनिकांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बाळासाहेबांच्या माघारी शिवसेना समर्थपणे सांभाळणारे उद्धव ठाकरे यांच्यासमोर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर मोठे आव्हान ठाकले आहे. संकटात असलेल्या उद्धव ठाकरे यांना प्रेम दाखवून देण्यासाठी शिवसैनिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली आहे. कोल्हापूर मध्ये उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून निष्ठा यात्रा काढण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले शक्तीप्रदर्शन करत नेते जरी बाजूला झाले असले तरी आम्ही लढण्यासाठी कमी नाही हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांसह महिलांचाही उस्फूर्तपणे निष्ठा यात्रेत सहभाग दिसून आला. फटाक्यांची आतषबाजी तसेच शिवसेना जिंदाबाद अशा घोषणांनी शिवसैनिकांनी यावेळी परिसर दणाणून सोडला. दसरा चौकातून प्रारंभ झाला. यावेळी उद्धव ठाकरे तुम आ...

तारदाळ : आठवडाभरात रस्ते न केल्यास आंदोलनाचा इशारा

पुणे मेट्रो लाईव्ह : इचलकरंजी : तारदाळ  राम मंदीर, पाटील गल्ली, खोत गल्ली ते कोळी मळ्या पर्यंत जाणारा रस्ता पूर्ण पणे चिखलमय झाला आहे. गेली दोन वर्ष या रस्त्याचे काम वर्क ऑर्डर असूनही अद्यापि प्रलंबित आहे लोकप्रतिनिधींच्या व संबंधित मक्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे  केवळ या रस्त्याबाबत वारंवार मक्तेदाराने आश्वासने देवून परिसरातील नागरिकांची दिशाभूल करत आहेत त्यामुळे या भागातील महिला व नागरिकांतून संबंधित मक्तेदार व लोकप्रतिनिधीं चा निषेध व्यक्त केला जात आहे आठवड्याभरात काम न सुरू केल्यास या भागातील महिला रस्त्यावर उतरतील असा इशारा या भागातील महिलांनी दिला आहे  याबाबत संबंधित मक्तेदारांना गावातील लोकप्रतिनिधी व नागरिकांनी फोन केला असता जाणीवपूर्वक चालढकल करण्यात येत आहे. सध्या सुरू असणाऱ्या पावसामुळे भागातील रस्त्यावर मोठ मोठ खड्डे पडले आहेत यातूनच महिला वर्गांना ज्येष्ठ नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागत आहे प्रसंगी एखादे वाहन जोरात गेल्यास अंगावर चिखल उडतो. कोरोची- तारदाळ - निमशिरगाव पर्यंतचा रस्त्यासाठी शासनाने निधी मंजूर केला...

अगर चुनाव आयोग मुफ्त में सामान बांटने वाले दलों का कुछ नहीं कर सकती तो फिर उसे भगवान ही बचाए

              केंद्र सरकार से मांगा जवाब पुणे मेट्रो लाईव्ह : सुप्रीम कोर्ट ने मंगलवार को इलेक्शन से पहले फ्रीबीज यानी मुफ्त में सामान बांटने या फिर उसका वादा करने वाले दलों पर रोक लगाने को लेकर एक याचिका पर सुनवाई करते हुए चुनाव आयोग पर तल्ख टिप्पणी की। सीजेआई एनवी रमण के नेतृत्व वाली तीन जजों की पीठ ने कहा कि अगर चुनाव आयोग मुफ्त में सामान बांटने वाले दलों का कुछ नहीं कर सकती तो फिर उसे भगवान ही बचाए। इसके साथ ही कोर्ट ने केंद्र सरकार से इस विषय पर उसके द्वारा उठाए जा रहे जरूरू कदमों पर जवाभ भी मांगा है। सुप्रीम कोर्ट ने मंगलवार को इस मामले में वित्त आयोग से पूछा कि क्या राज्यों को आवंटित होने वाले राजस्व में गैर जरूरी खर्चों का भी ख्याल रखा जाता है। चीफ जस्टिस ऑफ इंडिया इससे पहले भी कई गहरी बाते कर चुके हैं। भारत के चीफ जस्टिस एनवी रमण ने कहा कि दुनिया के सभी नागरिकों के लिए यह जरूरी है कि वे स्वाधीनता, स्वतंत्रता और लोकतंत्र को बरकरार रखने और आगे बढ़ाने के लिए लगातार प्रयासरत रहें, जिसके लिए हमारे पूर्वजों ने संघर्ष किया है। न्यायमूर्ति रमण ने अमेर...

प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर प्लास्टिक बंदी नियमामध्ये सुधारणा

पुणे मेट्रो लाईव्ह :    मुंबई, दि. २६ :- प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदीचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टिक बंदी नियमामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.             केंद्र शासनाने १ जुलै २०२२ पासून सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली असून राज्यात या बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र हे सिंगल युज प्लास्टिक बंदी करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.             राज्यात प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक शक्तिप्रदत्त समिती नेमण्यात आली होती. या समितीने ७ जुलै २०२२ रोजीच्या बैठकीत महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकॉल उत्पादने अधिसूचना २०१८ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्य शासनाने १५ जुलै २०२२ रोजीच्या अधिसू...

लोकांचे प्रश्न सोडवितांना सकारात्मकता ठेवा कामासाठी मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना सचिवांनी भेटले पाहिजे

विभागांच्या सचिवांच्या पहिल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना मुंबई, दि. २६ : लोकांचे प्रश्न सोडवतांना सकारात्मकता ठेवा,  राज्यभरातून मंत्रालयात  कामासाठी येणाऱ्या लोकांना सचिवांनी भेटले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र पुरस्कृत तसेच राज्याच्या योजना गतीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करा असे निर्देश दिले.  मुख्यमंत्री आज मंत्रालयात सर्व विभागांच्या सचिवांच्या पहिल्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. प्रशासन संवेदनशील, सचोटीचे, प्रामाणिक हवे अशी जनतेची अपेक्षा आहे.   महाराष्ट्राची देशात एक चांगली प्रतिमा आहे. खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्य शासनाच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली आहे.  तसेच इतर केंद्रीय मंत्री देखील राज्याला सहकार्य करण्यासाठी उत्सुक आहेत. अशा वेळी नावीन्यपूर्ण योजना देखील आपण मांडल्या पाहिजेत. नवनवीन  उपक्रमांचे स्वागत आहे.  केंद्राचा जास्तीत जास्त निधी कसा मिळेल हे पाहून तात्काळ असे प्रस्ताव सादर करावेत . विशेषत: रेल्वे, महामार्ग याबाबतीत केंद्राकडील पाठपुरावा वाढ...

पुणेकर जनतेच्या वतीने उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठीच महाआरतीचे आयोजन ना. डॉ. नीलम गोऱ्हे

  शिवसेनेचा महावृक्ष आणखी विशाल होण्याची प्रार्थना; श्री चरणी केला ६२ किलोंचा मोदक अर्पण पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे, ता. २६ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे केवळ पुणेकरांचे नव्हे तर देशभरातल्या असंख्य गणेश भक्तांचे आराध्य दैवत आहे. शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री उद्धवजी ठाकरे यांच्या दिनांक २७ जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्त आज येथे पुणे शहर शिवसेनेच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मा. श्री उद्धवजी ठाकरे यांचे सर्व संकल्प पूर्ण होवोत आणि राज्यातील जनतेच्या मनातील सर्व संभ्रम दूर होण्यासाठी आशीर्वाद मिळावेत. शिवसेनेचा वटवृक्ष विशाल महावृक्षात रुपांतरीत होवो, अशी प्रार्थना केल्याचे शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे सांगितले.  त्या म्हणाल्या, " *शिवसेना हा पक्ष शिवसैनिकांच्या भावनांवर आणि विचारांवर चालत असलेल्या पक्ष आहे. अनेक वेळा लोकांनी पक्षातून बाहेर जाण्याचा प्रसंग येऊन गेला. मात्र भगवद्गीतेच्या शिकवणीप्रमाणे जे गेले त्यांचा शोक करायचा नाही आणि आपले काम सातत्याने पुढे चालू ठेवायचे या तत्त्वानुसार मा.  उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ...