Skip to main content

Posts

कांग्रेस के दिग्गज नेता गुलाम नबी आजाद ने कांग्रेस के सभी पदों से इस्तीफा दिया

पुणे मेट्रो लाईव्ह : कांग्रेस के दिग्गज नेता गुलाम नबी आजाद ने कांग्रेस के सभी पदों से इस्तीफा दे दिया है। वे लंबे अर्से से पार्टी से नाराज चल रहे थे। वे पार्टी के अंदर बदलाव की मुहिम चलाने के समर्थक माने जाते थे। आजाद ने कुछ दिन पहले प्रचार समिति से भी इस्तीफा दे दिया था। आजाद ने पांच पेज का इस्तीफा सोनिया गांधी को भेजा है। उन्होंने अपने इस्तीफे की चिट्ठी में लिखा-बहुत अफसोस और बेहद भावुक दिल के साथ मैंने कांग्रेस से अपना आधा सदी पुराना रिश्ता तोड़ने का फैसला लिया है। उन्होंने अपनी चिट्ठी में इस बात का उल्लेख किया है कि कांग्रेस को भारत जोड़ो यात्रा की जगह कांग्रेस जोड़ो यात्रा निकालनी चाहिए।  गुलाम नबी आजाद की गिनती पार्टी के बेहद सीनियर नेताओं में होती थी और वे गांधी परिवार के बेहद करीबी नेताओं में एक माने जाते थे। लेकिन 2019 के बाद से पार्टी के अंदर बदलाव की आवाज उठने लगी और फिर जी-23 ग्रुप का उभार हुआ। इसमें वो नेता शामिल थे जो पार्टी में आमूलचूल परिवर्तन की मांग उठा रहे थे। इन नेताओं में गुलाम नबी आजाद भी बेहद मुखर थे। इससे गांधी परिवार से उनकी दूरी बढ़ती जा रही थी।...

पुणे, पिंपरी - चिंचवड मधील कलाकारांसाठी दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण

  गरजू कलाकारांना मिळणार मोफत रुग्णवाहिकेची सुविधा पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : एखाद्या निर्मात्याने रंगभूमी आणि चित्रपट कलाकार, तंत्रज्ञांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे हा निश्चितच चांगला उपक्रम आहे. महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना आहे. कोरोनाच्या काळात कलाकार, तंत्रज्ञ यांना वेळेवर रुग्णवाहिका व औषधोपचार उपलब्ध होत नव्हते. मात्र आता कधीही रात्री अपरात्री कलाकार, तंत्रज्ञ यांना रुग्णवाहिकेची  गरज पडली तर या रुग्णवाहिका मोफत उपलब्ध होणार आहेत. रंगभूमी आणि चित्रपट कलाकार, तंत्रज्ञ यांना संतोष चव्हाण यांनी उपलब्ध करून दिलेली ही सोय निश्चितच फायदेशीर ठरेल, असे मत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष  मेघराज राजेभोसले यांनी व्यक्त केले. स्वर सर्वेश प्रोडक्शन आणि सर्वज्ञ नाट्य संस्था  यांच्या वतीने नाट्य, चित्रपट निर्माते संतोष चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी संतोष चव्हाण, श्रावणी चव्हाण, विनोद खेडकर, अर्जुन जाधव आणि कलाकार,तंत्रज्ञ आदी मान्यवर उपस्थित होते.

तेर ऑलिम्पियाड २०२२-२३' चे उदघाटन ,.देशभरातील ५ लाख विद्यार्थ्यांचा सहभाग

दैनंदिन जीवनात कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण हवे : प्रीती सावला  प्रेस मीडिया लाईव्ह : पुणे : तेर पॉलिसी सेंटरच्या 'तेर ऑलिम्पियाड २०२२-२३' चे उदघाटन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडिया ( आयसीएआय )  च्या सेंट्रल काउन्सिल मेंबर प्रीती सावला यांच्या प्रमुख उपस्थितीत   ऑनलाईन पद्धतीने २५ ऑगस्ट, गुरुवारी सायंकाळी ४ वाजता झाले. तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक डॉ.विनिता आपटे,टाटा मोटर्सच्या सीएसआर विभागाचे उप सरव्यवस्थापक रोहित सरोज,मयुरेश कुलकर्णी  उपस्थित होते. तेर ऑलिम्पियाड ही विद्यार्थ्यांसाठी  निसर्ग,विज्ञान,पर्यावरण रक्षण विषयक प्रश्नमंजुषा स्पर्धा असून विजेत्यांना आकर्षक पारितोषिके दिली जातात.या उपक्रमाचे हे आठवे वर्ष आहे.   यावेळी बोलताना प्रीती सावला म्हणाल्या,'संस्कारक्षम वयात पर्यावरण जागृतीचा विचार विद्यार्थ्यांमध्ये पेरण्याचा  हा उल्लेखनीय उपक्रम आहे. सामाजिक योगदानासाठी नवीन पिढी सज्ज होत आहे,ही चांगली गोष्ट आहे.आपल्याला निसर्गाची आवश्यकता आहे. पुढील पिढ्यांसाठी त्याचे रक्षण केले पाहिजे,म्हणून कार्बन उत्सर्जनाची काळजी केली पाहि...

क्रांतिकारकांचे कार्य देशासाठी प्रेरणास्त्रोत -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

प्रेस मीडिया लाईव्ह : पुणे : देशासाठी शहीद झालेल्या क्रांतिकारकांचा देशाला अभिमान आहे. क्रांतिकारकांचे कार्य देशासाठी प्रेरणास्त्रोत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. राजगुरुनगर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हुतात्मा शिवराम हरि राजगुरू जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते पाटील आदी उपस्थित होते.  राज्यपाल म्हणाले, भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांना विसरून चालणार नाही. त्यांच्या बलिदानामुळे आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. हुतात्म्यांच्या देशभक्तीचा जागर झाला पाहिजे. त्यांचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबत देशसेवेसाठी  नागरिकाने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. देश विकासाच्या मार्गावर पुढे जात असताना या प्रक्रीयेला गती देताना देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिविरांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे. देशाला पुढे जाण्यासाठी आपल्या सर्वाचे प्रयत्न महत्वपूर्ण ठरतील. माझे नाही तर देशाचे आहे, असा राष्ट्रभाव जागृत ठेवण्यासाठी आपण शपथ घेतली पाहिजे.  ...

आरोग्यास अपायकारक ‘पफ वनस्पती’चा साडेदहा लाख रुपयांचा साठा जप्त

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे, दि. २३: अन्न व औषध प्रशासन, पुणे कार्यालयातर्फे आरोग्यास अपायकारक ‘पफ वनस्पती’ विक्रेत्यांवर कारवाई करुन १० लाख ५८ हजार ३८० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.  मार्केट यार्ड पुणे येथे अचानक छापे टाकून घाऊक विक्रेत्यांकडून विश्लेषणासाठी घेण्यात आलेल्या वनस्पती हा अन्न पदार्थ आरोग्यास अपायकारक असल्याचा अहवाल प्राप्त होताच घाऊक विक्रेते व वितरकांकडील उर्वरित साठा जप्त करण्यात आला. पफ वनस्पती (ग्रेड शेफ ब्रँड) या अन्न पदार्थाचे घाऊक विक्रेत्याकडे तपासणी करुन नमुना घेऊन उर्वरित ३ लाख ५२९ रुपये किंमतीचा १ हजार २८८ किलो साठा, तसेच वनस्पती पफ (सेंच्युरी ब्रँड) चा ४ जाख ३७ हजार ९६६ रुपये किंमतीचा २ हजार ५३ किलो साठा असा एकूण ७ लाख ३८ हजार ४९५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.  त्याच दिवशी सदर वनस्पतीच्या वितरकाकडे तपासणी केल्यानंतर पफ वनस्पती (ग्रेड शेफ ब्रँड) चा नमुना घेवुन उर्वरित ६६ हजार ९७६ रुपये किंमतीचा ४७८ किलो साठा तसेच पफ (सेंच्युरी ब्रँड)चा २ लाख ५२ हजार ९०९ रुपये किंमतीचा १ हजार ८७३ किलो साठा असा ३ लाख १९ हजार ८८५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आल...

सांस्कृतिक सभागृहे उघडण्याचा निर्णय झाल्याने उपोषण मागे

 असलम इसाक बागवान यांच्या उपोषणाची सांगता  पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : कोंढव्यातील इमाम अबु हनिफा,डॉ. आंबेडकर सभागृहे नागरिकांच्या कार्यक्रमांना खुली करण्याची मागणी पुणे महानगरपालिकेच्या समाज  विकास विभागाने  मान्य केल्याने इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान आणि सहकाऱ्यांचे पालिकेसमोर सुरू असलेले उपोषण स्थगित करण्यात आले. २२ ऑगस्ट रोजी उपोषणाची सांगता पालिकेचे समाज विकास अधिकारी रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आली.   स्थानिक माजी नगरसेवकानी ही सभागृहे बंद ठेवण्यासाठी महानगर पालीका अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता. त्यात माजी नगरसेवक रईस सुंडके यांचाही सहभाग होता.  ही सभागृहे उघडण्यासाठी  आणी शिवनेरीनगर येथील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर हॉल  येथे गरीबांच्या हाताला रोजगार तसेच महिला रोजगार प्रशिक्षण केंद्र (लाईट हाऊस) सूरू करण्यासाठी इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप गेली  दोन वर्ष प्रयत्न करीत होते . या प्रयत्नांना यश आले आहे.  उपोषणामध्ये असलम इसाक बागवान,इब्राहिम शेख, रियाज बंगाली,अब्दुल बागवान,सादिक पानसरे,अ...

पुणे : आज बेटी पढाव बेटी बचावचा कार्येक्रम अत्यंत थाटात संपन्न .

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे :  आज बेटी पढाव बेटी बचावचा कार्येक्रम  अत्यंत थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पी ए इनामदार होते एम सी ई सोसायटी  चेअरमन होते .  तर  डॉ. अजय दूबेजी, mrs  गुरमीत कौर मॅडम,  राहुलजी भंडारी , भगवान वैराठीजी , मुस्लिम बँकेचे संचालक मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद , हाजी सईद सय्यद , हाजी फयाज मोमीन , युसुफ शेख , मंतशा शेख , व रामभाऊ जगदाळे प्रमुख उपस्थिती म्हणून हजर होते.

वीज मीटर रीडिंग मधील अचूकतेसाठी महावितरणने अतिशय गांभीर्याने धडक उपाययोजना सुरू केल्या

वीजमीटर रीडिंग मध्ये हलगर्जपणा करणार्‍या एजन्सींविरुद्ध तसेच महावितरणच्या जबाबदार अधिकार्‍यांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : वीज  मीटर रीडिंग मध्ये हलगर्जपणा करणार्‍या एजन्सींच्या कामांचे मूल्यांकन करीत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारताच अस्पष्ट फोटोंचे प्रमाण 45 टक्क्यांवरून 3 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात महावितरणला यश आले आहे. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा नाहक मनस्ताप व वीजबिल दुरुस्तीच्या त्रासा सोबतच महावितरणच्या महसुलाचे नुकसान होत होते. हे लक्षात घेऊन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी राबविलेल्या मोहिमेमुळे महावितरणच्या वीजबिलांतील अचूकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एप्रिल ते जून 2022 या 3 महिन्यांत वीज विक्रीतही तब्बल 3 (825 द.ल.यु.) टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत वीज मीटरचे रीडिंग अचूकच झाले पाहिजे.वीज मीटर रीडिंग मधील अचूकतेसाठी महावितरणने अतिशय गांभीर्याने धडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अचूक रीडिंगसाठी सुधारणा न करणे, वीजमीटर योग्य स्थितीत असूनही हेतुपुरस्सरपणे नादुरुस्तीचा (फॉल्टी) शेरा देणे, सरासरी क...

देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून उमेदवारी देऊन खासदार करावे,

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे: अखिल  भारतीय ब्राह्मण महासंघाने भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून उमेदवारी देऊन खासदार करावे, अशी मागणी केली. त्यानंतर पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. त्यावर पुण्यातील भाजप खासदार गिरीश बापट यांनी मात्र सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांना खासदारकी दिली तर काहीच हरकत नसल्याचं त्यांनी माध्यामांशी बोलताना सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे हिरे आहेत. त्यांचं काम संपुर्ण महाराष्ट्राने जवळून पाहिलं आहे. गेले दोन महिने त्यांच्यात असलेली हिंमत देखील आपण सगळ्यांनीच अनुभवली. काही संघटनेकडून त्यांना पुण्याचे खासदार करा अशी मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी माझी काहीच हरकत नाही आहे. त्यांना खासदारकी दिली तर मला आनंदच होईल. कारण पुणे, पश्चिम महाराष्ट्राने त्यांच्या कामाची दृष्टी पाहिली आहे. त्यामुळे या गोष्टीचा आनंद असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. पक्षाच्या कोणत्याच आदेशाच्या बाहेर आम्ही दोघेही नाही. त्यामुळे पक्षाचा निर्णय अंतिम असेल. पक्ष सांगेत त्याप्रमाणे पुढची वाटचाल करु. भाज...

स्टार्टअप यात्रेद्वारे युवकांना नावीन्यपूर्ण संकल्पनेची माहिती

  स्टार्टअप यात्रेद्वारे युवकांना नावीन्यपूर्ण संकल्पनेची माहिती पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : कौशल्य, रोजगार, उद्योजकता नावीन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप व नावीन्यता यात्रेअंतर्गत पुणे शहर, हवेली व शिरुर तालुक्यातील युवा विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण संकल्पना व त्याअनुषगांने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली. तालुकास्तरीय प्रचार प्रसिद्धी व जनजागृती अभियान अंतर्गत जिल्ह्यात मोबाईल व्हॅनद्वारे  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध, अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे,  जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ  हांडेवाडी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिरूर, पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय अशा विविध ठिकाणी भेटी देण्यात आल्या.  तालुकानिहाय सत्राचे १९ ऑगस्ट रोजी पुरंदर, बारामती, वेल्हे व भोर, २३ ऑगस्ट रोजी इंदापूर व २९ ऑगस्ट रोजी जुन्नर आणि ३० ऑगस्ट रोजी खेड व आंबेगाव तालुक्यात आयोजन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी नवउद्योजकांनी  www.msins.in  किंवा www.mahastartupyatra.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. जिल्हयातील अधिकाधिक उमेदवारांनी ...