Skip to main content

Posts

गणेशोत्सवानिमित्त खास स्पर्धेचे आयोजन

पुणे मेट्रो लाईव्ह :   अवघ्या तीन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. राज्य सरकारने कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून असलेले निर्बंध उठवल्याने गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी  बाजारपेठा भाविकांनी फुलून गेल्या आहेत.  गेली दोन वर्षे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नाही. मात्र यंदा हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात आणि भक्तिभावाने साजरा होणार आहे.  याच उत्साहात भर घालण्यासाठी आणि मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी महाराष्ट्रातील निवडणूक अधिकाऱ्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ट्विटरवर एक मीम शेअर करत गणेशोत्सव देखावा स्पर्धेबाबत माहिती दिली आहे. शाळा चित्रपटातील एका प्रसंगावर हा मीम तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांतर्फे 'गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा २०२२ - माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार ' या स्पर्धेचे आयोजन केले आहे. मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक आणि लोकशाही हे या स्पर्धेचे विषय आहेत. स्पर्धकांना या विषयांवर आकर्षक देखावा तयार करायचा आहे. या स्पर्धेचा कालावधी 31 ‌ऑगस्ट त...

सोनाली फोगाट की मौत के मामले में गोवा पुलिस ने कर्लीज क्लब के मालिक और एक ड्रग पैडलर को गिरफ्तार किया

पुणे मेट्रो लाईव्ह : भाजपा नेता और टिक टॉक स्टार सोनाली फोगाट की मौत के मामले में गोवा पुलिस गहनता से छानबीन कर रही है। सोनाली फोगाट की मौत के मामले में गोवा पुलिस ने कर्लीज क्लब के मालिक और एक ड्रग पैडलर को गिरफ्तार किया है। अब तक इस मामले में सुधीर सांगवान और सुखविंदर समेत 4 की गिरफ्तारी हो चुकी है। पुलिस ने कर्लीज क्लब के बाथरूम से ड्रग्स भी बरामद किया है। इस बात की पुष्टि गोवा के IG ओमवीर बिश्नोई ने की है। वहीं गोवा पुलिस को जांच में पता चला है कि जो ड्रग्स सुधीर और सुखविंदर ने खरीदा था। 22 अगस्त की शाम को होटल के बाहर ड्रग्स पैडलर ने लाकर इनको दिया था। चारों आरोपियों का मेडिकल करवाकर उन्हें आज कोर्ट में पेश करके रिमांड पर लिया जाना है। पुलिस चारों आरोपियों से पूछताछ करेगी। पुलिस यह जानने का प्रयास करेगी कि आखिर इनकी मुलाकात कैसे हुई और ये ड्रग कहां से लाया गया।  सोनाली हत्याकांड में गोवा पुलिस ने बड़ा खुलासा किया है। गोवा पुलिस को जांच में पता चला है कि जो ड्रग्स सुधीर और सुखविंदर ने खरीदा था। 22 अगस्त की शाम को द ग्रैंड लियोनी रिजॉर्ट और होटल के बाहर ड्रग्...

कांग्रेस के दिग्गज नेता गुलाम नबी आजाद ने कांग्रेस के सभी पदों से इस्तीफा दिया

पुणे मेट्रो लाईव्ह : कांग्रेस के दिग्गज नेता गुलाम नबी आजाद ने कांग्रेस के सभी पदों से इस्तीफा दे दिया है। वे लंबे अर्से से पार्टी से नाराज चल रहे थे। वे पार्टी के अंदर बदलाव की मुहिम चलाने के समर्थक माने जाते थे। आजाद ने कुछ दिन पहले प्रचार समिति से भी इस्तीफा दे दिया था। आजाद ने पांच पेज का इस्तीफा सोनिया गांधी को भेजा है। उन्होंने अपने इस्तीफे की चिट्ठी में लिखा-बहुत अफसोस और बेहद भावुक दिल के साथ मैंने कांग्रेस से अपना आधा सदी पुराना रिश्ता तोड़ने का फैसला लिया है। उन्होंने अपनी चिट्ठी में इस बात का उल्लेख किया है कि कांग्रेस को भारत जोड़ो यात्रा की जगह कांग्रेस जोड़ो यात्रा निकालनी चाहिए।  गुलाम नबी आजाद की गिनती पार्टी के बेहद सीनियर नेताओं में होती थी और वे गांधी परिवार के बेहद करीबी नेताओं में एक माने जाते थे। लेकिन 2019 के बाद से पार्टी के अंदर बदलाव की आवाज उठने लगी और फिर जी-23 ग्रुप का उभार हुआ। इसमें वो नेता शामिल थे जो पार्टी में आमूलचूल परिवर्तन की मांग उठा रहे थे। इन नेताओं में गुलाम नबी आजाद भी बेहद मुखर थे। इससे गांधी परिवार से उनकी दूरी बढ़ती जा रही थी।...

पुणे, पिंपरी - चिंचवड मधील कलाकारांसाठी दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण

  गरजू कलाकारांना मिळणार मोफत रुग्णवाहिकेची सुविधा पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : एखाद्या निर्मात्याने रंगभूमी आणि चित्रपट कलाकार, तंत्रज्ञांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे हा निश्चितच चांगला उपक्रम आहे. महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना आहे. कोरोनाच्या काळात कलाकार, तंत्रज्ञ यांना वेळेवर रुग्णवाहिका व औषधोपचार उपलब्ध होत नव्हते. मात्र आता कधीही रात्री अपरात्री कलाकार, तंत्रज्ञ यांना रुग्णवाहिकेची  गरज पडली तर या रुग्णवाहिका मोफत उपलब्ध होणार आहेत. रंगभूमी आणि चित्रपट कलाकार, तंत्रज्ञ यांना संतोष चव्हाण यांनी उपलब्ध करून दिलेली ही सोय निश्चितच फायदेशीर ठरेल, असे मत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष  मेघराज राजेभोसले यांनी व्यक्त केले. स्वर सर्वेश प्रोडक्शन आणि सर्वज्ञ नाट्य संस्था  यांच्या वतीने नाट्य, चित्रपट निर्माते संतोष चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी संतोष चव्हाण, श्रावणी चव्हाण, विनोद खेडकर, अर्जुन जाधव आणि कलाकार,तंत्रज्ञ आदी मान्यवर उपस्थित होते.

तेर ऑलिम्पियाड २०२२-२३' चे उदघाटन ,.देशभरातील ५ लाख विद्यार्थ्यांचा सहभाग

दैनंदिन जीवनात कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण हवे : प्रीती सावला  प्रेस मीडिया लाईव्ह : पुणे : तेर पॉलिसी सेंटरच्या 'तेर ऑलिम्पियाड २०२२-२३' चे उदघाटन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडिया ( आयसीएआय )  च्या सेंट्रल काउन्सिल मेंबर प्रीती सावला यांच्या प्रमुख उपस्थितीत   ऑनलाईन पद्धतीने २५ ऑगस्ट, गुरुवारी सायंकाळी ४ वाजता झाले. तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक डॉ.विनिता आपटे,टाटा मोटर्सच्या सीएसआर विभागाचे उप सरव्यवस्थापक रोहित सरोज,मयुरेश कुलकर्णी  उपस्थित होते. तेर ऑलिम्पियाड ही विद्यार्थ्यांसाठी  निसर्ग,विज्ञान,पर्यावरण रक्षण विषयक प्रश्नमंजुषा स्पर्धा असून विजेत्यांना आकर्षक पारितोषिके दिली जातात.या उपक्रमाचे हे आठवे वर्ष आहे.   यावेळी बोलताना प्रीती सावला म्हणाल्या,'संस्कारक्षम वयात पर्यावरण जागृतीचा विचार विद्यार्थ्यांमध्ये पेरण्याचा  हा उल्लेखनीय उपक्रम आहे. सामाजिक योगदानासाठी नवीन पिढी सज्ज होत आहे,ही चांगली गोष्ट आहे.आपल्याला निसर्गाची आवश्यकता आहे. पुढील पिढ्यांसाठी त्याचे रक्षण केले पाहिजे,म्हणून कार्बन उत्सर्जनाची काळजी केली पाहि...

क्रांतिकारकांचे कार्य देशासाठी प्रेरणास्त्रोत -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

प्रेस मीडिया लाईव्ह : पुणे : देशासाठी शहीद झालेल्या क्रांतिकारकांचा देशाला अभिमान आहे. क्रांतिकारकांचे कार्य देशासाठी प्रेरणास्त्रोत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. राजगुरुनगर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हुतात्मा शिवराम हरि राजगुरू जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते पाटील आदी उपस्थित होते.  राज्यपाल म्हणाले, भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांना विसरून चालणार नाही. त्यांच्या बलिदानामुळे आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. हुतात्म्यांच्या देशभक्तीचा जागर झाला पाहिजे. त्यांचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबत देशसेवेसाठी  नागरिकाने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. देश विकासाच्या मार्गावर पुढे जात असताना या प्रक्रीयेला गती देताना देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिविरांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे. देशाला पुढे जाण्यासाठी आपल्या सर्वाचे प्रयत्न महत्वपूर्ण ठरतील. माझे नाही तर देशाचे आहे, असा राष्ट्रभाव जागृत ठेवण्यासाठी आपण शपथ घेतली पाहिजे.  ...

आरोग्यास अपायकारक ‘पफ वनस्पती’चा साडेदहा लाख रुपयांचा साठा जप्त

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे, दि. २३: अन्न व औषध प्रशासन, पुणे कार्यालयातर्फे आरोग्यास अपायकारक ‘पफ वनस्पती’ विक्रेत्यांवर कारवाई करुन १० लाख ५८ हजार ३८० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.  मार्केट यार्ड पुणे येथे अचानक छापे टाकून घाऊक विक्रेत्यांकडून विश्लेषणासाठी घेण्यात आलेल्या वनस्पती हा अन्न पदार्थ आरोग्यास अपायकारक असल्याचा अहवाल प्राप्त होताच घाऊक विक्रेते व वितरकांकडील उर्वरित साठा जप्त करण्यात आला. पफ वनस्पती (ग्रेड शेफ ब्रँड) या अन्न पदार्थाचे घाऊक विक्रेत्याकडे तपासणी करुन नमुना घेऊन उर्वरित ३ लाख ५२९ रुपये किंमतीचा १ हजार २८८ किलो साठा, तसेच वनस्पती पफ (सेंच्युरी ब्रँड) चा ४ जाख ३७ हजार ९६६ रुपये किंमतीचा २ हजार ५३ किलो साठा असा एकूण ७ लाख ३८ हजार ४९५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.  त्याच दिवशी सदर वनस्पतीच्या वितरकाकडे तपासणी केल्यानंतर पफ वनस्पती (ग्रेड शेफ ब्रँड) चा नमुना घेवुन उर्वरित ६६ हजार ९७६ रुपये किंमतीचा ४७८ किलो साठा तसेच पफ (सेंच्युरी ब्रँड)चा २ लाख ५२ हजार ९०९ रुपये किंमतीचा १ हजार ८७३ किलो साठा असा ३ लाख १९ हजार ८८५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आल...

सांस्कृतिक सभागृहे उघडण्याचा निर्णय झाल्याने उपोषण मागे

 असलम इसाक बागवान यांच्या उपोषणाची सांगता  पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : कोंढव्यातील इमाम अबु हनिफा,डॉ. आंबेडकर सभागृहे नागरिकांच्या कार्यक्रमांना खुली करण्याची मागणी पुणे महानगरपालिकेच्या समाज  विकास विभागाने  मान्य केल्याने इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान आणि सहकाऱ्यांचे पालिकेसमोर सुरू असलेले उपोषण स्थगित करण्यात आले. २२ ऑगस्ट रोजी उपोषणाची सांगता पालिकेचे समाज विकास अधिकारी रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आली.   स्थानिक माजी नगरसेवकानी ही सभागृहे बंद ठेवण्यासाठी महानगर पालीका अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता. त्यात माजी नगरसेवक रईस सुंडके यांचाही सहभाग होता.  ही सभागृहे उघडण्यासाठी  आणी शिवनेरीनगर येथील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर हॉल  येथे गरीबांच्या हाताला रोजगार तसेच महिला रोजगार प्रशिक्षण केंद्र (लाईट हाऊस) सूरू करण्यासाठी इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप गेली  दोन वर्ष प्रयत्न करीत होते . या प्रयत्नांना यश आले आहे.  उपोषणामध्ये असलम इसाक बागवान,इब्राहिम शेख, रियाज बंगाली,अब्दुल बागवान,सादिक पानसरे,अ...

पुणे : आज बेटी पढाव बेटी बचावचा कार्येक्रम अत्यंत थाटात संपन्न .

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे :  आज बेटी पढाव बेटी बचावचा कार्येक्रम  अत्यंत थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पी ए इनामदार होते एम सी ई सोसायटी  चेअरमन होते .  तर  डॉ. अजय दूबेजी, mrs  गुरमीत कौर मॅडम,  राहुलजी भंडारी , भगवान वैराठीजी , मुस्लिम बँकेचे संचालक मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद , हाजी सईद सय्यद , हाजी फयाज मोमीन , युसुफ शेख , मंतशा शेख , व रामभाऊ जगदाळे प्रमुख उपस्थिती म्हणून हजर होते.

वीज मीटर रीडिंग मधील अचूकतेसाठी महावितरणने अतिशय गांभीर्याने धडक उपाययोजना सुरू केल्या

वीजमीटर रीडिंग मध्ये हलगर्जपणा करणार्‍या एजन्सींविरुद्ध तसेच महावितरणच्या जबाबदार अधिकार्‍यांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : वीज  मीटर रीडिंग मध्ये हलगर्जपणा करणार्‍या एजन्सींच्या कामांचे मूल्यांकन करीत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारताच अस्पष्ट फोटोंचे प्रमाण 45 टक्क्यांवरून 3 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात महावितरणला यश आले आहे. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा नाहक मनस्ताप व वीजबिल दुरुस्तीच्या त्रासा सोबतच महावितरणच्या महसुलाचे नुकसान होत होते. हे लक्षात घेऊन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी राबविलेल्या मोहिमेमुळे महावितरणच्या वीजबिलांतील अचूकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एप्रिल ते जून 2022 या 3 महिन्यांत वीज विक्रीतही तब्बल 3 (825 द.ल.यु.) टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत वीज मीटरचे रीडिंग अचूकच झाले पाहिजे.वीज मीटर रीडिंग मधील अचूकतेसाठी महावितरणने अतिशय गांभीर्याने धडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अचूक रीडिंगसाठी सुधारणा न करणे, वीजमीटर योग्य स्थितीत असूनही हेतुपुरस्सरपणे नादुरुस्तीचा (फॉल्टी) शेरा देणे, सरासरी क...