Skip to main content

Posts

महवितरण ची प्रस्तावित दरवाढ रद्द करा: 'आप'

पुणे मेट्रो न्यूज :  महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता वीज कंपन्यांकडून वीज दर वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. या विरोधात आम आदमी पार्टीने तहसीलदार संतोष कणसे यांना निवेदन दिले. आपचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांच्या नेतृत्वात आज राज्यभर या विरोधात आम आदमी पार्टी तर्फे आंदोलन करण्यात आले.. शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकी पूर्वी राज्यातील जनतेला वचन दिले होते की आमचे सरकार आल्यास आम्ही ३०० युनिट घरगुती वापरात ३०% स्वस्त वीज देवू. तसेच बीजेपी कडून विविध राज्यातील निवडणूक जाहीरनाम्यात १०० ते २०० युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले आहे. एवढेच नव्हेतर मागच्या दोन वर्षात मा. देवेंद्र फडणवीस यांनी वीज दर वाढ व मोफत वीज देण्याबाबत अनेक वेळा रस्त्यावर येवून आंदोलने केली आहेत. दुसरीकडे दिल्ली मध्ये श्री अरविंद केजरीवाल सरकार मागच्या आठ वर्षांपासून २०० युनिट वीज मोफत आणि जास्ती वापर करणाऱ्यांनाही कमीत कमी दरात वीजपुरवठा करीत आहे. तसेच नव्याने सरकार मध्ये आलेले पंजाब मधील श्री भगवंत मान सरकार ने सुद्...

भाजप शहर अध्यक्ष ॲड अनिल डाळ्या सह क्राॕ के एल मलाबादे जनता चौकात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आंदोलन केले.

पुणे मेट्रो लाईव्ह : इचलकरंजी  : सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असते, असे वक्तव्यकरुन ओ बी सी चा अपमान राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचारसभेत केला होता. यासाठी सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याऐवजी राहुल गांधी व रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करत आहेत, राहुल गांधीचा निषेध व  हाय हाय मुर्दाबाद च्या घोषणा देत भाजप शहर अध्यक्ष ॲड अनिल डाळ्या सह क्राॕ के एल मलाबादे जनता चौकात  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आंदोलन केले. अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार असताना पोलिस यंत्रणेचा बेकायदा वापर करून कित्येक नेतेवर  यांच्यावर कारवाई केली. न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य न करता राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस व आघाडीचे अनेक पक्षांचे नेते न्यायालयाचा व डाॕ बाबासाहेब आंबेडकर च्या संविधानाचा अपमान करत आहेत.निषेध करत त्याविरोधात भाजपा  रस्त्यावर उतरली आहे. या वेळी  अमर कांबळे, अरविद शर्मा,ॲड भरत जोशी आरुण कुंभार  प्रविण पाटील उमाकांत दाभोळे , रामदास कोळी...

बेडकिहाळ येथे प्रभाग ७ ८ व ९ येथे विकास कामाना प्रारंभ.

  बेडकिहाळ येथे प्रभाग ७ ८ व ९ येथे विकास कामाना प्रारंभ.       गोपाळदादाचे स्वप्नपूर्ती होणारच . पुणे मेट्रो लाईव्ह :  बेडकिहाळ, ता,20-  ग्राम पंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातून प्रभाग क्रमांक ७, ८, व  ९ येथे मूलभूत सार्वजनिक सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने सीसी गटार योजनेसाठी २१ लाख  व  सिद्धार्थ नगर  भागात  जल शुद्धीकरण घटक  कामासाठी ३ लाख ४० हजाराचा भरीव निधी तरतूद करण्यात आला असून या कानांचा शुभारंभ रविवार (ता १९) रोजी सिद्धार्थ नगर परिसरात युवा नेते दत्तकुमार पाटील, कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे सहकार्यदर्शी प्रमोदकुमार पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.      जेसीबी यंत्राचे पूजन ग्राम पंचायतीच्या अध्यक्षा  सविता पाटील, उपाध्यक्षा महादेवी यादव, सदस्या विद्या देसाई, सुवर्णा बत्ते, आशामा मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले तर  जेष्ठ कार्यकर्ते ग्राम पंचायत माजी अध्यक्ष शंकर पाटील, युवा नेते ग्राम पंचायत सदस्य दत्तकुमार पाटील,  तालुका पंचायत माजी सदस्य चांद मुल्ला, ताजुद्दिन मुल्ला, अ...

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अडून कोणी राजकारण करत असेल तर जशास तसे उत्तर देऊ

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अडून कोणी राजकारण करत असेल तर जशास तसे उत्तर देऊ पुतळा समितीने सुचवलेल्या जागेवर लवकरच भूमिपूजन पुणे मेट्रो लाईव्ह : शिरोळ / प्रतिनिधी      न्यायालयाच्या जागेवर तांत्रिक अडचण असल्याने पुतळा त्या ठिकाणी नाही हे जवळपास निश्चित झाले असतानाही काही समाजातील स्वयंघोषित कार्यकर्त्यांनी आपली दुकानदारी कायम सुरू ठेवावी यासाठी  किंवा कुणाची तरी मर्जी सांभाळण्यासाठी सुपारी बहाद्दरांनी चालवलेला खटाटोप कदापि यशस्वी होणार नाही.अशा दिशाभूल करणाऱ्या ढोंगी कार्यकर्त्यापासून तमाम दलित बांधवांनी सावध रहावे आशा संतप्त भावना शिरोळ तालुक्यातील विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीच्या शाहूनगर येथील बौद्धविहारात आयोजित केलेल्या बैठकीत व्यक्त केल्या.बैठकीच्या अध्यक्षस्थानी आरपीआयचे अब्दुल बागवान होते.यावेळी पुतळा समितीचे उपाध्यक्ष विजय पवार उपस्थित होते.यावेळी भन्ते यश काश्यपायन यांनी पुतळा समितीच्या बैठकीत उपस्थित राहून आशीर्वाद दिले.   प्रारंभी माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी निवडणूकित दिलेले आश्वासन पाळले...

. तनवीर इनामदार यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात संपन्न झाला

तनवीर इनामदार यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात संपन्न झाला पुणे मेट्रो लाईव्ह   पुणे : मुस्लिम बँकेचे चेअरमन डॉ. पी ए इनामदार व सर्व बँकेचे संचालक मंडळा तर्फे बँकेचे संचालक   मा. तन्वीर इनामदार यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मुस्लिम बँकेचे एडमिन ऑफिसर  व बँकेचे सर्व स्टाफ उपस्थितीत होते.

कारण मागे भट नावाचा उभा हिमालय आहे.....

  पुणे मेट्रो लाईव्ह : प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) “उष :काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली “… अशी क्रांतीज्योत मनात पेटवणाऱ्या सुरेश भट यांचा मंगळवार ता. १४ मार्च २०२३ रोजी विसावा स्मृतिदिन आहे.त्यांचा जन्म १५ एप्रिल १९३२ रोजी अमरावती येथे झाला .आणि १४ मार्च २००३ रोजी ते नागपुरात कालवश झाले.सुरेश भट हे त्यांच्या मित्रपरिवारात, शिष्य परिवारात आणि साहित्यवर्तुळात” दादा ” या नावाने ओळखले जात असत.अर्थात ते खऱ्या अर्थाने दादा माणूसच होते .मराठी कवितेत त्यांनी दिलेले योगदान अनमोल स्वरूपाचे आहे .मेंदीच्या पानावर, आज गोकुळात रंग ,मलमली तारुण्य माझे, गे माय भू तुझे मी ,आता जगायाचे असे ,तरुण आहे रात्र अजुनी यासारखी शेकडो अजरामर गाणी ,कविता ,भावगीते , पोवाडे त्यांनी लिहिले .पण त्यांची खरी ओळख आहे ती म्हणजे मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती हीच आहे.एखाद्या प्रतिभावंत आणि रसिकमान्य कवीने एखाद्या काव्य प्रकाराबाबत संपूर्ण आयुष्य वाहून घेणे आणि त्यात नव्या पिढ्या निर्माण करण्याचे जिवनध्येयी काम करणे हे फार दुर्मिळ असते.सुरेश भट उर्फ दादा हे त्य...

रमा शशांक बावचकर यांचे निधन

पुणे मेट्रो लाईव्ह :  इचलकरंजी ता. ११ इचलकरंजीचे माजी नगरसेवक,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव आणि समाजवादी प्रबोधिनीचे खजिनदार शशांक बावचकर यांच्या पत्नी आणि शहर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कालवश मल्हारपंत बावचकर यांच्या स्नुषा रमा शशांक बावचकर यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने राहत्या घरी निधन झाले.  त्यांच्यामागे पती शशांक यांच्यासह दोन कन्या ,दोन जावई, दोन नातवंडे असा मोठा परिवार आहे.ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे ,आमदार प्रकाश आवाडे,सुरेशराव हाळवणकर,सचिन चव्हाण,रवींद्र माने,मदन कारंडे,सागर चाळके,नितीन जांभळे, संजय कांबळे,राहुल खंजिरे, अशोक स्वामी, अलका स्वामी, विठ्ठल चोपडे ,जयकुमार कोले ,शिवगोंड खोत,प्रा.रमेश लवटे यांच्यासह विविध  राजकीय व सामाजिक मान्यवर व कार्यकर्त्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.सोमवार ता.१३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता रक्षा विसर्जन आहे.

पी. ए. ईनामदार विद्यापीठ महाराष्ट्र कॉस्मोपॉलीटन एज्युकेशन सोसायटी अवामी महाज

मुस्लिम बॅक पुणे तर्फे शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीतील सार्वजनिक मंडळांच्या वतीने सत्कार  व नागरिकांना पाणी वाटप  पुणे मेट्रो लाईव्ह :  पुणे : विदागपती शिवाजी महाराज जयंती निमित्त डॉ. पी. ए. ईनामदार  विद्यापीठ महाराष्ट्र कॉस्मोपॉलीटन एज्युकेशन सोसायटी अवामी महाज मुस्लिम बॅक पुणे तर्फे शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीतील सार्वजनिक मंडळांच्या वतीने सत्कार  व नागरिकांना पाणी वाटप करण्यांत आले यावेळी डॉ. पी. ए. ईनामदार यांच्या हस्ते सर्व मिरवणुकीतील मंडळ यांना शाल व श्री फळ देऊन सत्कार करण्यात आला .  यावेळी, ईकबाल अन्सारी यांनी  सुत्रसंचालन केले तसेच. मुश्ताक पटेल, वहाब मणियार , शाकीर तांबोळी, आरीफ सय्यद, इम्तियाज शेख तनवीर आबीद शेख हिदायत मस्कुर  अहमद शेख , मोहम्मद गौस बबलू सय्यद ,  मोकाशी , नाना,  नितीन  शोरावडे , आबीद  शेख उपस्थित होते या सर्व कार्यक्रमाचे संयोजन मशकुर अहमद शेख उमर  शरीफ शेख, मोहंमद गौस यांनी केले .

सुफी संत हज़रत ऐनी शाह (रहे.) यांचा उरुस संपन्न

सुफी संत हज़रत ऐनी  शाह (रहे.) यांचा उरुस साजरा झाला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत उरुस संपन्न झाला . पुणे मेट्रो लाईव्ह :  पुणे : सुफी संत  हजरत सैय्यदी पीर ऐनी शाह सहा किला (हे.) यांचा उरुस नुकताच अत्यंत थाटामाटात व उत्साहात पुणे भवानी पेठ येथील रोशन मस्जिद, दुल्हा-दुल्हन कब्रिस्तान येथे साजरा करण्यात आला. उरुसाचे हे ७ वे वर्ष होते.  सायंकाळी सहा नंतर सुफी संत  हज़रत सैय्यदी पीर ऐनी शाह  (रहे) यांच्या मजार शरीफ वर गिलाफ  चादर,  चढवण्यात आली त्या नंतर  हजरत यांचे वारसदार जान शिन मौलाना शाह नजीरुद्दीन उर्फ (मख्तुमी शाह) यांनी फातिहा देऊन सलाम पढून उपस्थित सर्वांसाठी दुवाँ व प्रार्थना केली.  या नंतर सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.  भोजना नंतर हज़रत यांचे वारसदार व जानशिन) मौलाना शाह नजीरुद्दीन (उर्फ मख्तुमी शाह) यांचा  विशेष बयान ठेवण्यात आले होते. प्रथम फूलपान  करण्यात आले :  हजरत यांचे बायान सुरू होण्या लअगोदर रोशन मस्जिदचे  हाफीज मौलाना अहमद कादरी यांनी  हजरत शाह नजीरुद्दीन उर्फ (मख्तुमी शाह)...

पुणे : सुफी संत हजरत ऐनी शाह ( रहे.) यांचा गुरुवारी ऊर्स

पुणे : सुफी संत हजरत ऐनी शाह       ( रहे.)  यांचा गुरुवारी ऊर्स. पुणे मेट्रो लाईव्ह :  पुणे  :  सुफी संत हजरत सय्यदी पीर ऐनी शाह सहाब किब्ला ( रहे ) यांचा उर्स उर्दु ता. १६ व इंग्रजी महिना तारीख  १६ मार्च  वार गुरुवार  रोजी साजरा करण्यात येणार आहे. गेल्या सहा  वर्षापासून हजरत यांचा ऊर्स मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. हजरत यांची मजार शरीफ पुणे स्थित भवानी पेठ दुल्हा दुल्हन कब्रिस्तान येथे आहे. या ठिकाणीच उर्स साजरा करण्यात येतो .  सुफी संत हजरत ऐनी शहा  (रहे) यांचा ऊर्स हजरत यांचे वारसदार ( जानशिन) हजरत शाह नजीरूद्दीन कादरी उर्फ (मखदुमी) शाह यांचे मार्फतच  उरुसाचे सर्व नियोजन केले जाते. त्यांचे प्रमुख गुरू मौलांना गौसवी शहा सहाब (  हैदराबाद) यांचे पुर्व परवानगीने व त्यांचे आदेशा नुसार करतात. सुफी संत हजरत ऐनीशाह रहे. यांचे मुरीद (शिष्य) अखंड महाराष्ट्रभर आहेत. हजरत यांचे सर्व शिष्य हजर राहून उर्साचे सर्व कामकाज पाहतात. सायंकाळी असरच्या नमाज नंतर हजरत यांचे मजार शरीफ वर गिलाफ चादर चढवण्यात येतो व मजार शरी...