Skip to main content

Posts

निसर्ग कन्या अशी उपाधी मिळवणारी कु.अभिज्ञा वयाच्या अवघ्या सात व्या वर्षी निसर्ग प्रति...

 " अभिज्ञा  म्हणाली बाबा म्हणून मोठया प्रमाणात झाडं लावली पाहिजे"            कव्हर स्टोरी....       एका लहान मुलीची पर्यावरणाच्या  प्रती उत्तम कामगिरी अन्वरअली शेख पुणे मेट्रो लाईव्ह  देहूरोड दि.६ निसर्ग कन्या अशी उपाधी मिळवणारी कु.अभिज्ञा वयाच्या अवघ्या सात व्या वर्षी निसर्ग प्रति प्रेम भावना व निसर्ग निर्मितीच्या महान कार्यात मग्न अशी ही देहूरोड शहराच्या केंद्रीय विद्यालय नंबर १.तिसरी  मध्य शिकत असताना पर्यावरणाची काळजी घेतली आणि पर्यावरण संवर्धन, निसर्ग रक्षणाच्या बाबतीत,तेसच मानवतेच्या दृष्टीकोनातून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तिला (नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थने ) कार्याची दखल घेऊन कु.अभिज्ञा पंकज तंतरपाळे यांना संस्थच्या वतीने प्रमाणपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले आहे.   कु अभिज्ञा ची निसर्ग प्रति प्रेमाची कहाणी मागील दोन वर्षांपूर्वी जन्माला आली संपूर्ण जग कोरोना या भयंकर महामारी-शी झुंजत होता भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली होती,अनेक निष्पाप लोकं या आजारा मुळे मरण पावले,र...

हर घर मे तिरंगा आणि देश प्रेम

पुणे मेट्रो लाईव्ह : आजादी का अमृत महोत्सव  अंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022  प्रत्येक घर ,ऑफीस ,शाळा सगळ्या ठिकाणी तिरंगा उभारण्यासाठी घर घर  तिरंगा अभियान चालवण्यात येत आहे त्याबद्दल काही गोष्टी मला मनापासून वाटतात .त्या आपल्या सोबत शेअर करत आहे .  घर घर तिरंगा याअंतर्गत प्रत्येक घर ,ऑफिस, शाळा या ठिकाणी तिरंगा आपण फडकवणार आहोत पण ह्या तिरंग्याचा अभिमान फक्त दोन दिवसासाठी आहे का ? आणि दोन दिवसानंतर म्हणजे 16 ऑगस्टला त्या तिरंग्याचे काय होणार?  काही तिरंगे हे कागदी असतील, काही तिरंगे हे प्लास्टिकचे असतील, काही तिरंगे हे कापडाचे असतील पण दोन दिवसांचे अभियान झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी ह्या तिरंग्याच काय होणार..? तर मला असे वाटते की ...दोन दिवसाचे घर घर तिरंगा अभियान झाल्यानंतर पुढे तो तिरंगा रस्त्यावर फेकला जाऊ नये, तिरंगा कोणाच्या पाया खाली येता कामा नये .तिरंग्याचा अवमान होता कामा नये असे मला वाटते .त्यामुळे घर घर तिरंगा ठीक आहे पण प्रत्येक घराघरातील माणसाच्या मनामध्ये तुम्ही तिरंगा कसा फडकवणार ?फक्त दोन दिवस घरावरती तिरंगा फडकवून खरंच देशप्रेमाची ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेसह राज्यातील 23 महापालिका

  निवडणुकीसाठी जाहीर झालेली प्रभागरचना व आरक्षण सोडत राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली. पुणे मेट्रो लाईव्ह  अन्वरअली शेख पिंपरी-चिंचवडसह राज्यातील २३ महापालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेली प्रभाग रचना व आरक्षण सोडतीबाबत झालेली सर्व प्रक्रिया रद्द करण्यात यावी. जोपर्यंत पुढील आदेश येत नाहीत तोपर्यंत निवडणूक संदर्भात कोणताही निर्णय घेता येणार नाही, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक लांबणीवर गेली असून निवडणुकीची प्रभागरचना व आरक्षण सोडत नव्याने करण्यात याव्यात, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्य प्रभागरचना केली होती. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयाच्या कचाट्यात आडकल्यानंतर ओबीसींना वगळून आरक्षण जाहीर करण्यात आले. राज्यात सत्तांतर होताच ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटला. त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गाचे व महिलांचे आरक्षण रद्द करण्यात आले. ओबीसींचा समावेश करून नव्याने सोडत ...

बिगबॉस मराठी विजेती अभिनेत्री मेघा धाडे आता 'ररा' लघुपटात

  महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचारा विरुद्ध 'ररा' हिंदी लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे:सद्ध्याच्या घडीला महिलांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचार प्रमाण पाहता प्रत्येक मुलीच्या अंगात राजमाता जिजाऊ माँसाहेब, सावित्रीबाई फुले, माता रमाई, झाशीची राणी आणि अहिल्याबाई होळकर संचारणे ही काळाची गरज आहे.तरच आज महिला आणि मुली सुरक्षित राहू शकतात. याच विषयांवर आधारित शिवगर्जना Creations प्रस्तूत सचिन गवळी लिखित/दिग्दर्शित 'ररा'ही हिंदी शॉर्ट फिल्म बनवत आहेत. या शॉर्ट फिल्म मध्ये बिगबॉस मराठी विजेती अभिनेत्री मेघा धाडे, बालकलाकार पार्श्र्वी आणि सचिन गवळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.तसेच गणेश शेजवळ, स्वप्नील गुडेकर, मच्छिंद्र बोरगुडे आणि यश जगताप हे सहकलाकार आहेत.कॅमेरा सचिन केदारी, केतन चिकणे तर प्रॉडकशन ची जबाबदारी निखिल खांदवे, अभय पोते, स्नेहलराज कारंडे, प्रणाली साबळे तसेच मेक अप नवीन परमार आणि शिवाजी गोडे यांनी केला.लवकरच 'ररा'ही हिंदी शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

विद्युत वाहिनीचा खांब वाहतुकीला व नागरिकांना अडथळा निर्माण करणाऱ्या या खांबाला स्थलांतरित करण्यात पंकज तंतरपाळे यांना यश

पुणे मेट्रो लाईव्ह अन्वरअली शेख देहूरोड दि ५. शहराच्या छावणी परिसरातील वार्ड क्रमांक चार बँक ऑफ इंडिया श्री कृष्ण नगर ते एम बी कॅम्प या रोड वर मधोमध विद्युत वाहिनीचा खांब कित्येक वर्षा पासुन वाहतुकीला अडथळा निर्माण करत होता, त्या ठिकाणी अपघातही घडत होते, चालकांना त्या ठिकाणी नेहमीच कवायत करावी लागत असे, स्थानिक नागरिक व रस्त्याने पायदळ ये-जा करणारे वय-वृद्ध व्यक्ती अथवा अन्य सामान्य नागरिकांना त्रासदायक असा हा खांब,रोडच्या मधोमध असलेला विद्युत  वाहिनीचा खांब अनेक वर्षापासून रोडच्या मध्यभागी उभा होता, किती वेळा उंच गाड्या त्या ठिकाणी विद्युत वाहिनी खांबाला धडकून अपघात घडले,  त्यामुळे स्थानिक वस्तीत वीज खंडित होत असे.हा त्रास नेहमीचाच होता, अनेक राजकीय व्यक्ती कार्यकर्ते येथून ये जा करत असतात, परंतु हा खांब सर्वांची नजर चुकावून सर्वसामान्य जनतेला व रस्त्यावरील वाहन चालकांना त्रासदायक ठरत होता, परंतु सामान्य जनतेसाठी सदैव प्रयत्न करणारे आणि झटणारे युवा नेते पंकज तंतरपाळे यांच्या बारीक व दूरदृष्टी पासून हा खांब स्वतःला वाचवू शकला नाही, रावेत डिव्हिजन महावितरण विभाग यांना सतत पाठपु...

जिल्हा परिषद परिसरात तिरंगा ध्वज विक्री केंद्राचा शुभारंभ

  प्रेस मीडिया लाईव्ह :  पुणे दि.५: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘घरोघरी तिरंगा’उपक्रम १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान  राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत कार्यरत स्वयं सहाय्यता समूह, ग्रामसंघ यांच्याद्वारे जिल्हा परिषद परिसरात तिरंगा ध्वज विक्री केंद्राचा शुभारंभ  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, उप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, सचिन घाडगे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.        ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’निमित्त घरोघरी तिरंगा फडकवावा यासाठी अनेक ठिकाणी तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात येत आहे. तशी विक्री केंद्रेही विविध ठिकाणी सुरू करण्यात आली आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने बचतगटातील महिला भगिनींनी तिरंगा ध्वज  विक्री उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांनी या केंद्रावरून ध्वज घ्यावा आणि प्र...

दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

मालिकेतील आकर्षक क्रमांक लिलाव पद्धतीने चारचाकींसाठी राखून ठेवता येणार पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे :  पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत दुचाकींसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित तीनपट शुल्क भरून हवे असतील अशा चारचाकी वाहन मालकांनी ५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास त्याची यादी ८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.  त्याच दिवशी दुपारी ४.३० वाजता सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नवीन वाहन नोंदणी विभाग यांच्या कक्षात लिलाव करण्यात येईल. दुचाकी वाहन मालकांनी आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असल्यास ८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २....

१४ ऑगस्टपर्यंत खाद्यतेल भेसळ विरोधी मोहीम

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे दि.४: खाद्यतेल, वनस्पती तेल तसेच बहु-स्रोत खाद्यतेला संदर्भात पुणे विभागात येत्या १४ ऑगस्टपर्यंत खाद्यतेल भेसळ विरोधी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे सहायक आयुक्त ए.जी.भुजबळ यांनी दिली.  सर्वसामान्य जनतेला चांगल्या प्रतीचे खाद्यतेल मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विशेष मोहिमांच्या माध्यमातून खाद्यतेलाचे नमुने प्रयोगशाळेमार्फत तपासणीसाठी घेते. त्याच धर्तीवर नवी दिल्लीच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात खाद्यतेल, वनस्पती तेल तसेच बहु-स्रोत खाद्यतेलाच्या अनुषंगाने सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे.  ३ ऑगस्टपासून ही मोहीम राबविण्यात येत असून १४ ऑगस्टपर्यंत स्थानिक व नामांकित मोठ्या नाममुद्रेचे (ब्रॅंड) नमुने सर्वेक्षणासाठी घेऊन विश्लेषण करण्यात येणार आहे. बहु-स्रोत खाद्यतेलाची विक्री ॲगमार्क परवान्याशिवाय करता येत नाही. त्यामुळे याबाबत देखील तपासणी करण्यात येणार आहे. सुट्या खाद्यतेल विक्रीस प्रतिबंध असून सुटे खाद्यतेल विक्री करणाऱ्यांवर कायद्यांतर्गत कारवाई देण्यात येण...

शिवसेनेच्या वतीने पोलिस महासंचालकांना भेटून दिले निवेदन आणि शिवसैनिकांवर होणाऱ्या हल्ल्यांवर कार्यवाही करण्याची मागणी

पुणे मेट्रो लाईव्ह : ना. डॉ. नीलम गोऱ्हे, खा. विनायक राऊत, खा. अरविंद सावंत, आ. अजय चौधरी, आ. सचिन अहिर, आ. मनीषा कायंदे, संजना घाडी यांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट.  आज राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्याशी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर होत असलेले हल्ले, मारहाणीच्या घटनेबाबत शिवसेनेच्या वतीने प्रत्यक्ष भेटून आज यावर नियंत्रण ठेवून योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी राज्यात झालेल्या विविध घटनांवर कार्यवाही करावी अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले.  या सर्व घटनांवर विशेषत: पुण्यातील घटनेवर प्राधान्याने  योग्य ती कार्यवाही करण्याचे आणि त्याचा अहवाल तयार करण्याचे पोलिस महासंचालकांनी मान्य केले. शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत आवश्यक त्या सुधारणा करून परिवहन विभागाचे परिपत्रक दुरुस्त करण्यात येईल असे सांगितले.  महाराष्ट्र पोलीस मागील काही महिन्यांत गुजरात, आसाम, गोवा राज्यात जास्त दिवस गेले होते तेंव्हा त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विचारला. याला खा.विनायक राऊत यांनी पाठिंबा दिला. यावर माहित...

पिं.चिं. शहर रा. काँ पार्टीच्या महिला उपाध्यक्ष अर्चना राऊत

  यांचा वाढदिवस मदद फाउंडेशन देहूरोडच्या वतीने साजरा करण्यात आला. पुणे मेट्रो लाईव्ह  अन्वरअली शेख  :  देहूरोड दि ४. देहूरोड शहरातील सामाजिक संघटन मदत फाउंडेशनच्या वतीने पिं.चिं. शहर रा. काँ पार्टीच्या महिला उपाध्यक्ष   अर्चना राऊत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, नेहमी गोर गरीब व गरजूंच्या मदतीला धावून येणारी अर्चनाताई राऊत अशी ख्याती असणारी अर्चना राऊत यांनी आपली ओळख लोकसेवेतून निर्माण केली आहे.  ३अगस्त रोजी सायंकाळी मदद फाउंडेशनच्या कार्यालयात अर्चना राऊत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी  मुस्लिम समाजाचे विचारवंत  अब्दुल  गफुर भाई शेख , मदद फाउंडेशनचे अध्यक्ष अब्बास भाई शेख, फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष गौस सुणार, मलिक शेख युवा नेते ,सोहेल बेपारी ,सलीम शेख, फरत अत्तार,परवेज उर्फ सोनू शेख आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. अन्वरअली शेख पुणे मेट्रो लाईव्ह