Skip to main content

Posts

राशन कार्ड धारकों के लिए समाचार..

  राशन कार्ड पर अनाज की ऑनलाइन जांच अब आसानी से संभव;  सीखो कैसे करनी हे जांच पुणे मेट्रो लाईव्ह : अन्वरअली शेख  :  पुणे शहर तारीख २६ खाद्य सुरक्षा अधिनियम के तहत राशन कार्ड के माध्यम से गरीबों को मुफ्त खाद्यान्न वितरित किया जाता है।  इसके लिए सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) काम कर रही है।  इसमें  अधिक पारदर्शिता लाने के लिए सरकार ने एक ऑनलाइन प्रणाली  ('ई-पीओएस' )शुरू की है।  इसके माध्यम से राशन कार्ड धारकों को कितना अनाज मिलता है इसकी जानकारी दी जाती है।  उसके बारे में… ' ई-पीओएस' क्या है ?  'ई-पीओएस' का मतलब 'इलेक्ट्रॉनिक प्वाइंट ऑफ सेल' सिस्टम है।  यह एक केंद्रीय प्रणाली है, और राशन कार्ड धारक को इस बात की जानकारी मिलती है कि कितना और कब खाद्यान्न वितरित किया गया है।  उसके लिए राशन कार्ड धारकों का आधार कार्ड संलग्न करना होगा।  यह व्यवस्था राज्य में सबसे पहले जनवरी 2017 में लातूर जिले में शुरू की गई थी।  अब यह योजना पुरे राज्य में लागू की गई है। कार्रवाई की प्रणाली  राशन कार्ड पर कोई भी सदस्य राशन की दुक...

रिक्षा चालकांच्या भाडेवाडीच्या मागणीला यश , आनंददायी भाडेवाढ

    पुणे मेट्रो लाईव्ह  अन्वरअली शेख : पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि बारामती येथे तीन आसनी रिक्षांची भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. काही वृत्तपत्रामध्ये, डिजिटल मीडियावर पुणेकरांच्या खिशाला कात्रण या प्रकारे वृत्त प्रसारित झाले आहेत तर त्यावर प्रतिक्रिया देत एका रिक्षावाल्याने प्रश्न उपस्थित केला की रिक्षावाल्यांच्या भाड्यामध्ये किंचित वाढ होत आहे त्या वाढीबाबतही जर कुणाच्या डोळ्यात खुपत असेल  असेल तर हे दुर्दैवच, हल्ली महागाई आभाळाला शिवत असताना रिक्षावाल्यांच्या भाड्यामध्ये किंचित वाढ झाली आहे परंतु हेही  आनंददायी आहे. नवे दर 1 ऑगस्टपासून लागू होणार असून, ज्या रिक्षा 1 ऑगस्टपासून मीटर पून:प्रमाणीकरण (meter callibaration) करून घेतील त्या रिक्षा चालकांनाच नव्याने भाडेवाढ घेण्याचा अधिकार असणार आहे. विविध रिक्षा संघटनांनी वाढलेल्या इंधनदराच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढीची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर तसेच खटुआ समितीच्या शिफारशीस अनुसरून सदर बैठकीमध्ये ऑटोरिक्षा भाडेवाढीचा निर्...

18 बोगस अभियंत्यांना पदोन्नती देण्याचा पुणे महानगरपालिकेचा घाट ; मेगा पद भरतीच्या गडबडीत बोगस अभियंत्यांना नियुक्तीपत्र देण्याचा डाव

पुणे शहर खड्डेग्रस्त, नागरिक त्रस्त पण मनपा प्रशासन बोगस अभियंत्यांच्या प्रमोशनसाठी आग्रही ! आम आदमी पक्षाचे मनपा बाहेर तीव्र आंदोलन पुणे मेट्रो लाईव्ह ; संपूर्ण पुणे शहरांमध्ये खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झालेली असताना पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, सामान्य प्रशासन विभाग आणि स्थापत्य विभाग हे बोगस अभियंत्यांना पदोन्नती देण्याच्या प्रयत्नांमध्ये व्यस्त आहेत. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची कोणतीही मान्यता नसताना जे आर एन राजस्थान विद्यापीठातून दूरस्थ पद्धतीने अभियांत्रिकी पदविका घेतलेल्या 18 बोगस अभियंत्यांवर फौजदारी कारवाई करण्याऐवजी त्यांच्या पदोन्नतीचा घाट महापालिकेमध्ये घातला जात आहे. सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये मेगा पद भरती चालू असून त्याबाबत होणाऱ्या गोंगाटाचा  फायदा घेऊन निमुटपणे दिनांक 29 जुलै 2022 रोजी डीपीसी ( डिपार्टमेंट प्रमोशन कमिटी) बैठक आयोजित करून या 18 बोगस अभियंता पदोन्नती देण्याचा डाव पुणे महानगरपालिकेमध्ये शिजत आहे. या विरोधामध्ये आज आम आदमी पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या गेट बाहेर तीव्र आंदोलन करून याचा विरोध दर्शविण्यात आला. जोपर्यंत याबाबत आम आदमी पक्...

पावसाने विकास कामाचे दावे पडले खोटे !

कोंढव्यातील रहिवासी नागरी समस्यांनी त्रस्त पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : कोंढव्यातील रहिवासी नागरी समस्यांनी त्रस्त झाले असून पावसाने विकास कामाचे दावे  खोटे पडले आहेत. इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक असलम बागवान यांनी ही माहिती दिली. पुणे प्रभाग क्रमांक २७ कोंढवा खुर्द येथील शिवनेरीनगर ,  भाग्योदय नगर मिठानगर, साईबाबानगर ४२ व इतर ठिकाणी लाखोंची निविदा भरून बनविलेले रस्ते आज खड्डेमय बनले आहेत. गटारी झाकणे तोडून वाहत आहेत,  गेले पाच वर्ष काम कमी आणी कार्यक्षम तेचा ढिंढोराच जास्त वाजविला गेला, शिक्षणाची गैरसोय महानगरपालीका शाळेची अवस्था पाहण्या जोगी झाली आहे. शाळेत विदयार्थी संख्या जास्त असल्याने एकाच वर्गात अनेक इयत्तेचे विद्यार्थी बसवले आहेत.  हज हाऊस आश्वासन ठरले खोटे  विकास कामात केलेले दावे खोटे ठरले आहेत. ओटा मार्केट,लायब्ररी, मुस्लिम मते घेण्याकरीता उद्दघाटन करूनहि पुर्ण न झालेले हज हाऊस,पाण्याची टाकी, सांस्कृतिक हॉल यावर  माजी नगरसेवकांनी उत्तर द्यावे, असे असलम इसाक बागवान यांनी म्हटले आहे.

मुंबईतील फौजदारी न्यायालयांची अधिकृत भाषा मराठीच आहे

असा महत्त्वपूर्ण निर्वाळा विशेष 'मोक्का' न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे.  पुणे मेट्रो लाईव्ह : मुंबईतील फौजदारी न्यायालयांची अधिकृत भाषा मराठीच आहे. 25 वर्षांपूर्वीच्या जुन्या अधिसूचनेत याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यानुसार कनिष्ठ न्यायालयांचे कामकाज मराठी भाषेतच चालेल  इंग्रजी किंवा उर्दू भाषेत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा विशेष 'मोक्का' न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. 2011 च्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीने खटल्याशी संबंधित कागदपत्रांच्या इंग्रजी भाषांतरासाठी केलेली विनंती विशेष न्यायालयाने यावेळी धुडकावून लावली. 25 वर्षांच्या जुन्या अधिसूचनेचा दाखला देत न्यायालयाने बॉम्बस्फोटातील आरोपी नदीम अख्तरची याचिका फेटाळून लावली. आरोपीने 2011 मधील तिहेरी बॉम्बस्फोटांच्या खटल्याशी संबंधित कागदपत्रांच्या तब्बल 1,800 पानांचे इंग्रजी भाषांतर उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्याच्या या याचिकेवर सुनावणी करताना विशेष 'मोक्का' न्यायालयाने जुन्या अधिसूचनेतील मराठी भाषेसंबंधित तरतुदीवर बोट ठेवले. मराठी भाषेत असलेल्या कागदपत्रांचे इंग्रजीत भाषांतर करणे अत्यंत वे...

वस्त्रनगरीच्या औद्योगिक विकासात आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे मोलाचे योगदान

 चेअरमन तथा आमदार प्रकाश आवाडे यांचे वार्षिक सर्व साधारण सभेत प्रतिपादन पुणे मेट्रो लाईव्ह : वस्त्रनगरीच्या औद्योगिक विकासात कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे मोलाचे योगदान आहे. अत्याधुनिकतेला प्राधान्य देत बँक भविष्यातही औद्योगिक क्रांतीसाठी कटीबध्द राहिल, अशी ग्वाही बँकेचे चेअरमन तथा आमदार प्रकाश आवाडे यांनी येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेची 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना दिली.याप्रसंगी बँकेचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेची 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा इचलकरंजी येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात पार पडली. त्याप्रसंगी चेअरमन तथा आमदार प्रकाश आवाडे यांनी दोन वर्षे कोरोना महामारीचा काळ आणि त्यानंतर रशिया-युक्रेनमधील युध्दाचा परिणाम जगाच्या अर्थकारणावर झाला. त्यातून बँकिंग क्षेत्रसुध्दा सुटले नाही, असे सांगत आमदार आवाडे यांनी, वस्त्रनगरी आता अत्याधुनिक बनली असून साध्या लूमपासून ती आता शटललेस सिटी बनली आहे. त्याला चालना देण्या...

पुणे महानगरपालिका पद भरतीसाठी घेण्यात येणारे परीक्षा शुल्क कमी करण्यात यावा..

महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना भाजप तर्फे निवेदन देण्यात आले .  पुणे मेट्रो लाईव्ह :     पुणे महानगरपालिका पद भरतीसाठी घेण्यात येणारे परीक्षा शुल्क कमी करण्यात यावा, त्या मुळे महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांना दिलासा मिळेल. यासाठी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना भाजप तर्फे निवेदन देण्यात आले . याबाबत  लवकर निर्णय घ्यावा अन्यथा भाजप तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. पुणे महानगरपालिका  विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 448 रिक्त पदं काढण्यात आली आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच, 20 जुलै 2022 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट pmc.gov.in वर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. मात्र या अर्जासाठी शुल्क भरपूर असल्याने ही मागणी करण्यात आली आहे. जाहिराती मार्फत गट 2 मधील 4 पदे तर गट 3 मधील 444 पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून दहा ऑगस्ट पर्यंत अर्ज मागवले आहेत. पद भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षे...

वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी माधुरी जांभळे

पुणे मेट्रो लाईव्ह : रायगड जिल्हा :  सुनील पाटील वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सरपंच ताई पवार यांना अपात्र म्हणून ठरवून पदावरुन हटविण्यात आल्याने सरपंचपद रिक्त होते. ग्रामपंचायतीच्या सरपंच बडतर्फ केले गेल्यामुळे त्या रिक्त असलेल्या जागी उपसरपंच  काम करीत असलेल्या माधुरी भगवान जांभळे यांची प्रभारी सरपंच म्हणून निवड करण्यात आली. ग्रुप ग्राम पंचायत वासांबे (मोहोपाडा ) प्रभारी सरपंच पदी सौ माधुरी भगवान जांभळे यांची निवड झाली त्यांचे अभिनंदन समवेत  मा. सरपंच श्री लक्ष्मण शेठ पारंगे,श्री कृष्णा पारंगे  सरपंच सौ ताई पवार, रायगड भूषण श्री अरविंद पाटील, श्री लक्ष्मण जांभळे, श्री शाम म्हसकर,श्री संजय कांबळे, श्री अशोक पारंगे, श्री उत्तम माळी श्री रतन गायकवाड, श्री नितीन पारंगे, श्री दिनकर पारंगे, श्री राम पारंगे, भगवान जांभळे, श्री पुंडलिक पवार, श्री जयंत पारंगे यावेळी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी सचिन कुराडे उपस्थित होते. प्रभारी सरपंचपदी माधुरी भगवान जांभळे यांची निवड झाल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांच...

शिंदे गटाला मनसेमध्ये सामील करुन घेणार..? राज ठाकरेंनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले...

 पुणे मेट्रो लाईव्ह : सुनील पाटील :  एकनाथ शिंदेंनी  आपल्यासोबत शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेऊन बंड केले. अगोदर सुरत नंतर गुवाहटी असा प्रवास करुन ते १२ दिवसानंतर महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात विशेष अधिवेशन होऊन नवीन सरकार स्थापन झाले.या संपूर्ण घडामोडींवर राज ठाकरेंचे प्रतिक्रिया समोर आली आहे. झी २४ तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. शिंदे गटाला मनसेमध्ये सामील करुन घेणार..? राज्यातील सध्याचे सरकार हे कायदेशीर प्रक्रियेमध्ये अडकले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला वेगळी मान्यता मिळाली नाही तर ते मनसेमध्ये जाण्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. त्यावर आता राज ठाकरेंनी उत्तर दिले आहे. ''बाहेर पडलेले सर्व माझे जुने सहकारी आहेत, मी त्यांच्यासोबत पुर्वी काम केलेले आहे. आणि हा सर्व टेक्नीकल भाग आहे. परंतु उद्या जर त्यांच्याकडून काही प्रस्ताव आला तर त्याबाबत नक्की विचार करेन असे राज ठाकरे म्हणाले आहे. आताचे आमदार फुटण्याचे कारण तेच...राज ठाकरे दरम्यान आपल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी इतर गोष्टींवर देखील भाष्य केले आहे. ते म्ह...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यास सज्ज व्हा- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पुणे मेट्रो लाईव्ह रायगड जिल्हा : सुनील पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसमोर त्याग आणि शिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे. पक्षाच्या आदेशानुसार काम करण्याच्या आपल्या सामर्थ्याच्या जोरावर आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत आणि पक्ष संघटना मजबूत करायची आहे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी पनवेल येथे केले.        भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणी बैठक शनिवार दिनांक २३ जुलै रोजी पनवेल मधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडली. यावेळी उद्धाटन सत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी सी. टी. रवी, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी, प्रदेश सहप्रभारी जयभानसिंह पवय्या आणि ओमप्रकाश धुर्वे, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व विजया रहाटकर, चंद्रशेखर बावनकुळे,  विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भा...